Type Here to Get Search Results !

पत्रा तालीम मानाच्या श्री पणजोबा गणपतीला निरोप लवकरच साकारणार 'श्रीं' ची भव्य-दिव्य नवीन मूर्ती


निरोप देण्यापूर्वी गणेश भक्तांनी घेतले श्रींचे दर्शन

सोलापूर : कुठल्याही कार्याची सुरुवात होते, ती श्री गणेशापासून... सोलापूर शहरातील पत्रातालीम परिसरातील शहर-जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्व परिचित असलेला मानाचा श्री पणजोबा गणपतीची भव्य-दिव्य मूर्ती ही नव्याने तयार करण्यात येणार असून पूर्वीच्या मूर्तीची महापूजा शनिवारी सायंकाळी हजारो महिला भगिनींच्या शुभहस्ते व तमाम गणेश भक्तांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आली. या महापूजेनंतर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

 निरोप देण्यापूर्वी उपस्थित गणेश भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. लवकरच पुनश्च नव्याने श्रींची मूर्ती साकारण्यात येणार असल्याने ही मूर्ती लवकरात लवकर तयार व्हावी, याची उत्सुकता आता गणेश भक्तांना लागून राहिली आहे.

याप्रसंगी खलिफा पैलवान, दत्तात्रय कोलारकर, माजी स्थायी समिती चेअरमन पद्माकर उर्फ नानासाहेब काळे, श्रीकांत घाडगे, गणेश शेळके, मनोज गादेकर, बापू जाधव, अमोल चव्हाण, दीपक उर्फ पिंटू चव्हाण, दद्दू भोसले, सचिन शिंदे, राजू यलशेट्टी, पैलवान बबलू जाधव, सुहास कोलारकर, राहुल उर्फ बाबू बनसोडे, पैलवान सुरज बंडगर, आकाश पांढरे, प्रकाश जाधव, प्रवीण इरकशेट्टी, नवनाथ बन्ने, सचिन स्वामी, उत्तम कोलारकर, प्रभाकर भोजरंगे, संतोष बनसोडे, देविदास घुले, बबलू धूळराव, धनराज शिंदे, प्रकाश काळे,  ओंकार जाधव, अंकुश वाघमारे, वैभव गंगणे, निशांत सावळे, जल्पेश घुले, सुहास चाबुकस्वार, भैय्या धंगेकर, शुभम धूळराव, सनी धूळराव, महेश जगदाळे, निलेश शिंदे, आनंद कोलारकर, तमा गुडूर, सुरज पाटील, किशोर गादेकर, मनोज शेळके, मुन्ना भुरळे, रणजित बन्ने, आकाश बन्ने, सुमित जाधव, ओंकार कदम, आशिष शेळके, यांच्यासह पत्रा तालीम परिसरातील स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.