Type Here to Get Search Results !

आ. विजयकुमार देशमुख, मनिष काळजे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाचं उद्धाटन


सोलापूर : महायुती सरकारकडून राज्यात विकासात्मक कामांवर विशेष भर दिला जातोय. कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी व आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून निधीसाठी प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दखल घेऊन त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शनिवारी या कामाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आले.



आमदार विजयकुमार देशमुख व  सोलापूर महानरपालिका यांच्या संयुक्तिक निधीतून २५ लाख रुपये खर्चून सुशोभीकरणाच्या विकास कामांना शनिवारपासून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांचा बसवप्रेमींनी पुष्पगुच्छ व शाल परिधान करून विशेष सत्कार केला.

याप्रसंगी माजी नगरसेवक शिवानंद पाटील, अमर पुदाले, नागेश भोगडे, प्रसाद झुंजे यांच्या बसव प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.