सोलापूर : आईच्या मृत्यूनंतर माहेरकडील संपत्तीचा हिस्सा न घेतल्याच्या कारणावरून विवाहितेचा सासरी छळ झालाय. ही घटना लग्नानंतर १५ दिवसांपासून डिसेंबर २०२३ दरम्यान घडलीय. सौ. प्रिती अभिषेक साठे (वय-४० वर्षे) असं या विवाहितेचं नांव आहे. तिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी पती अभिषेक अशोक साठे याच्यासह ०५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हल्ली विजापूर रस्त्यावरील सैफुल प्रियंका नगरात वास्तव्यास असलेल्या साठे हिचा विवाह १ मे २०११ रोजी झाला होता. लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसात सासरच्या मंडळींनी संगनमत करून लग्नामध्ये हुंडा दिला नाही, नंतरदेखील काही पैशांची व्यवस्था केली नाही, म्हणून कूरबूर सुरू केली होती.
त्यानंतर सौ. प्रीतीच्या आईचे निधन झालं, त्यावेळीही तिने माहेरकडील संपत्ती हिस्सा न घेतल्याच्या कारणावरून तिच्या जाचहाटात वृध्दी झाली. तिला घालून-पाडून हिणवून बोलणे, शिवीगाळी व मारहाण करणे हे प्रकार नित्याचेच झाले. या शारीरीक मानसिक आणि आर्थिक छळास कंटाळून १७ डिसेंबर २०२३ रोजी माहेर जवळ केले.
सौ. प्रितीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अभिषेक अशोक साठे (पती), रंजणा अशोक साठे (सासू), अशोक महादेव साठे (सासरे, सर्व रा. महालक्ष्मी क्षतीज कॉलनी नं २ जगताप डेरी पिंपळे निलख पुणे), उमा अविनाश मोळक (नणंद) आणि अविनाश अशोक मोळक (नंणदेचे पती) यांच्याविरुद्ध भादवि ४९८ (अ), ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार/१०४३ गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.