प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या शंभरहून अधिकांना उज्वला कनेक्शनचं वितरण
सोलापूर : आनंद गोसकी यांनी पक्ष कार्यासोबत समाजकार्य करीत असतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, कोविड-लसीकरण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर सर्व लोकोपयोगी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन सोलापूर जिल्हा भाजपचे लोकसभा प्रमुख विक्रम देशमुख यांनी केले.
भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ०८ साखर पेठ, विणकर बागेसमोरील परिसरात प्रभागातील व परिसरातील गरजूंना प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे,भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांच्या शुभहस्ते व जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद मधुकर गोसकी यांच्या पाठपुराव्याने शंभरहून अधिक लाभार्थांना, गॅस शेगडी, टाकी, रेग्युलेटरचं वितरण करण्यात आले. यावेळी देशमुख बोलत होते.
गेल्या १५-२० वर्षापूर्वी तत्कालिन सरकारच्या सत्ताकाळात गॅस कनेक्शन मिळण्यासाठी आमदार -खासदाराचं शिफारस पत्र मागितलं जायचे, भाजपा सरकारने पारदर्शकपणे जन-सामान्यापर्यंत उज्वला योजना सक्षमपणे पोहोचवत आहेत, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी आनंद गोसकी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं माध्यम म्हणून कार्य करण्याचा आनंद अवर्णनिय असल्याचं आपल्या प्रास्ताविकात सांगून त्याचाच एक भाग म्हणून उज्वला गॅसचं वितरण होत असल्याचे म्हटले.
यावेळी कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करून, लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणूक सोशल मिडीया प्रमुख योगेश गिरामे, रविकुमार अगनुर, महेश दासी, आकाश बुर्ला, दिनेश श्रीकोंडा, दिनेश सुरा, शाम कोटा, श्रीकांत येमुल, ऋषिकेश चिलवेरी, बालाजी कुंठला, माधवचार्य कोटा, मोहन पेगड्याल, संतोष क्यातम यांनी परिश्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन प्रा. संदीप क्षीरसागर यांनी केले. यावेळी कमी किंमतीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना गॅस उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरीकांनी प्रधानमंत्र्यांचं आभार व्यक्त केले.
...... चौकट .......
कोरोना काळातील आनंद गोसकी यांचं कार्य अविस्मरणीय आहे : शहराध्यक्ष नरेंद्र काळे
आनंद गोसकी यांनी या भागातील सामान्य नागरिकांसाठी कोरोनाच्या काळात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सीजन बेड, रेमडिसिवर इंजेक्शन आदी लाभ मिळवून दिला. कम्युनिटी किचन च्या माध्यमातून परिसरात अन्नधान्याचा पुरवठा केला, त्यांचं हे कार्य अविस्मरणीय आहे. ते वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर असे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवितात. असेही शहर अध्यक्ष नरेंद्र काळे सांगून आनंद गोसकी यांच्या कार्याचं कौतुक केले.