Type Here to Get Search Results !

डॉक्टरला धमकी; डॉ. करजगीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर : तुम्हाला लय मस्ती आली आहे, तुम्ही आमच्याविरुद्ध नेहमी अपील दाखल करता, जुन्या मिलच्या जागेत पडू नका, असे म्हणून डॉ. कुमार करजगी व त्यांच्या साथीदारांनी एका डॉक्टरला धमकी दिलीय. ही घटना येथील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ बुधवारी सायंकाळी ४:१५ च्या सुमारास घडलीय. याप्रकरणी सदर बझार पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार डॉ. कुमार करजगी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, डॉ. संदिप शंकरराव आडके व आकुडे असे मिळून अपिल असल्याने भुमी अभिलेख कार्यालयात गेले होते, तेथे कामगार नेते तथा डॉ. कुमार करजगी त्यांच्या २ सहकाऱ्यासमवेत अगोदरच आले होते. अपिलचे काम संपल्यानंतर डॉ. संदीप आडके घरी जाणेसाठी निघाले असता. डॉ. करजगी आणि इतरांनी तुम्हाला लय मस्ती आली आहे, तुम्ही आमच्याविरुद्ध नेहमी अपील दाखल करता, जुन्या मिलच्या जागेत पडू नका, असे म्हणून धमकी दिली.

तत्पूर्वी डॉ. करजगी यांनी आकुडे याच्या खांद्यावर जोरात धक्का दिला. त्यानंतर ते पार्किंगकडे गेले असता, तेथे त्या तिघांनी त्यांची गाडी आडवी लावून तुम्ही येथून कसे जाता असे म्हणून पुन्हा दमदाटी सुरू केली. 

त्यावेळी तुम्हाला जे करायचे आहे, ते कायदेशीर करा, असा त्रास देऊ नका असं सांगितलं आणि पोलिसांना फोन केला असता ते तेथून निघून गेले, अशा आशयाची फिर्याद डॉ. संदीप आडके यांनी गुरुवारी रात्री सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केलीय. 

त्यानुसार कुमार करजगी, विक्रांत खुळे आणि करजगी यांचा ड्रायव्हर अशा तिघाविरुद्ध भादवि ३४१, ३२३, ५०४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार/१४०५ गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.