कासेगांव/संजय पवार: उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगे तळे येथील श्री शिक्षण प्रसारक मंडळी सोलापूर संचलित हर्षवर्धन हायस्कूलमधील परिसरात उन्हाच्या तीव्र झळा जाणवल्यास प्रारंभ झालाय. अशा वेळी मुक्या पाखरांना पाण्याची व्यवस्था राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत करण्यात आली.
गत वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाच्या झळा तीव्रतेनं जाणवू लागल्या आहेत. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जणू संकट म्हणून येऊ पाहतोय. अशावेळीवाढू मुक्या पक्षांना चोचीत बसणाऱ्या चार-दोन थेंब पाण्यासाठी दूर दूर भटकावं लागते, काहींना पाण्याअभावी तडफडून आपला जीव गमवावा लागतो.
यावेळी पक्षांचे महत्त्व याविषयी माहिती प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेना समन्वयक शिक्षक संजय जवंजाळ यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचं महत्त्व, पाण्याचा वापर जपून कसा करावा याचे मार्गदर्शन केले. पशू-पक्षी आणि प्राणी यांच्या जीवनदायी पाणी आहे, माणसाला बोलता येतं, परंतु पशू-पक्षांना बोलता येत नाही, म्हणून तो जीव वाचवून आपण साक्षात ईश्वर सेवा करीत आहेत असे वाटतं. त्यांनी अमूल्य पाण्याचं महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यावेळी प्रशालेतील सहशिक्षक विपुल गंभीरे, अर्जुन बनसोडे, श्रीमती पल्लवी दराडे व विद्यार्थी उपस्थित होते.