लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 एम.सी.एम.सी समितीची स्थापना

shivrajya patra

सोलापूर : लोकसभा सर्वत्रिक निवडणूक-2024 च्या भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यम प्रामाणिकरण व सनियंत्रण (M. C. M. C ) समिती दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी गठीत केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खालील प्रमाणे जिल्हास्तरीय माध्यम प्रामाणिककरण व सनियंत्रण समिती गठीत केली आहे. 

अध्यक्ष- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,कुमार आशीर्वाद, सदस्य तथा सह निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले, सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सदस्य तथा प्राध्यापक संगणक शास्त्र विभाग पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ डॉ. श्रीराम राऊत, सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, सदस्य तथा कार्यक्रम प्रसिद्ध अधिकारी, आकाशवाणी केंद्र सोलापूर सुजित बनसोडे, सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर सुनील सोनटक्के आदींचे समितीमध्ये समावेशन करण्यात आले आहे.

To Top