कामती : पुणे येथील मामासाहेब मोहोळ क्रिडा संकुल कात्रज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुकच्या दशरथ खराडे या पैलवानांचे ब्रांच पदक मिळवले. त्यामुळे कामती पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दशरथ खराडे याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलाने अतुलनीय प्रकारची कामगिरी केल्यामुळे कुस्तीप्रेमी यांनी दशरथ याचे अभिनंदन करून कौतुकाची थाप दिली आहे. लहानपणापासूनच कुस्तीची आवड असलेल्या दशरथ यांनी कुस्तीच्या सरावाची सुरुवात शाहू तालीम कामतीमधून केली. त्यानंतर चांगल्या सरावासाठी सोलापूर येथील श्रीकृष्ण कुस्ती केंद्र या ठिकाणी पैलवान भरत मेकाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सराव केला.