Type Here to Get Search Results !

जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देवणी बसस्थानकात पाणपोई; जीवने-पाटील मित्र मंडळाचा उपक्रम


देवणी : येथे उद्योगपती जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देवणी शहर व तालुक्यातील येणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी देवणी बसस्थानक येथे पाणपोईची सोय जून महिन्यापर्यंत करण्यात आलीय. या पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगपती बिपिन जयवंतराव पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.



याप्रसंगी यशवंतराव पाटील, हवगिराव पाटील, शेषराव मानकरी, विजयकुमार लुले, भगवान बिरादार, दीपक मळबगे, स्वामी, शिवा कांबळे, श्रीमंत लुल्ले, योगेश तगरखेडे, करीम शेख. डी. एल. मेत्रे, तहसील कार्यालयाचे साळुंखे, बिजापुरे, पोलीस स्टेशनचे उत्सरगे, कांबळे व देवणी बसस्थानकाचे आगार प्रमुख पाटील, मेहत्रे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.