सोलापूर : देशभर बेकायदा कृत्यास सहभागी असलेल्या "सिमी" या दहशतवादी संघटनावरील बंदीला केंद्र सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी ही माहिती दिली.
"सिमी" या दहशतवादी संघटनावरील बंदीला केंद्र सरकारने पुन्हा मुदतवाढ दिल्या संदर्भात गृहविभागाने पोलीस आयुक्तालयास एका पत्राव्दारे कळविले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्रालयाने बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियम १९६७ अन्वये "सिमी" संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. या बंदीची मुदत संपताच पुन्हा नव्याने मुदतवाढ दिली असल्याचे म्हटले आहे.