सोलापूर : महिलांनी आपल्या आयुष्याचा मार्ग स्वतः सक्षमपणे निवडावा. स्वतःमधील शक्ती ओळखून आहार, व्यायाम, स्वावलंबन आणि आत्मविश्वास ही चतु:सुत्री अवलंबावी तरच यशाची खात्री असते, असे प्रतिपादन उपअधीक्षक लोहमार्ग पोलीस संगीता हत्ती यांनी केले.
त्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, महिला शाखा, ल.गो. काकडे एज्युकेशनल फाउंडेशन सोलापूर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने सेवासदन प्रशालेत झालेल्या महिला जागर मेळाव्याचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ.श्रीकांत येळेगावकर, महिला शाखा अध्यक्षा हेमा चिंचोळकर, प्रा. डॉ. नभा काकडे, फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेच्या व्हाईस चेअरपर्सन प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड उपस्थित होते.
महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. मेळाव्यात नुकतीच करअधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या पूजा कांबळे व तलवारबाजी मध्ये राष्ट्रीय पातळीवर सिल्वर पदक मिळवणाऱ्या अपेक्षा सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
द्वितीय सत्रात सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, प्रांजली काळे, रेश्मा दुधाळ, मच्छिंद्र राठोड यांनी सायबर गुन्ह्यामध्ये महिलांची फसवणूक यावर माहिती दिली. यावेळी बोलताना गजा म्हणाले की, डिजिटल युगात अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करावेत व कोणत्याही अमिषाला बळी पडू नये.
तृतीय सत्रात गुंतवणूक सल्लागार वासंती येळेगावकर यांनी आर्थिक गुंतवणुकीसाठी खूप पैसा हाती पाहिजे असे नसून, आपण केवळ शंभर रुपयां पासून ही गुंतवणूक करू शकतो असे सांगून आर्थिक स्वावलंबणाचे महत्त्व पटवून दिले. चौथ्या सत्रात भारत पेट्रोलियमचे सेवानिवृत्त अधिकारी सुनील माढेकर यांनी घरगुती गॅसचा वापर व घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.
मेळाव्यास देऋब्रा संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता आराध्ये, विजय कुलकर्णी, सतीश पाटील, ॲड. अनिल काकडे, प्रशांत कुलकर्णी, शंकर कुलकर्णी, ॲड. मंगला जोशी-चिंचोळकर, क्रांती महिला संघाच्या प्रकल्प समन्वयिका रेणुका जाधव, एन. एस. ओ. पी. प्लस विहान प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयिका विजयश्री आमले, फॅमिली प्लॅनिंग च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कवीता चंडक, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा तथा अरुणा गॅस एजन्सीच्या मालक काजल सिंदगी इत्यादी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील 110 महिला उपस्थित होत्या
प्रारंभी प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नभा काकडे यांनी केले तर आभार डॉ. आयेशा रंगरेज यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्षितिजा गाताडे, शुभदा कुलकर्णी, स्मिता देशपांडे, मधुरा वडापुरकर, सुगतरत्न गायकवाड, वीरेंद्र परदेशी, अर्चना पारशेट्टी, सुरेखा डबरे, आकाश गायकवाड, करण खानापुरे यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : सेवासदन प्रशालेत महिला जागर मेळाव्याचे उद्घाटन करताना संगीता हत्ती, डॉ. श्रीकांत येळेगावकर, हेमा चिंचोळकर, प्रा. डॉ.नभा काकडे, प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, सुगतरत्न गायकवाड, सुशांत कुलकर्णी, विजय कुलकर्णी, दत्तात्रय आराध्ये, सतीश पाटील आदी.