Type Here to Get Search Results !

विविध संघटनातील नूतन पक्षप्रवेशितांचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजाज यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत


सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव तथा राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ-पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोषभ घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्वच प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी व महिला पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. या विविध संघटनातील नूतन  पक्षप्रवेशितांचा शुक्रवारी सांगली जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुरोगामी महाराष्ट्राची विचारसरणी जपण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचा नेहमीच मोलाचा वाटा राहिला आहे. आज या विचारांचे अनुयायी असलेल्या बामसेफ प्रणित बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून येणाऱ्या काळात सांगलीमध्ये संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी ताकदीने काम करु, अशी ग्वाही पक्षप्रवेशितांनी सत्कारानंतर बोलताना दिली.


यावेळी बामसेफ प्रणित राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्याचे माजी कार्यकारी अध्यक्ष तसेच सांगली जिल्ह्याचे बामसेफचे माजी अध्यक्ष शितल विठ्ठल खाडे, राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे स्थानिक कार्यकर्ते, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पदाधिकारी, भारती युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच सांगलीमधील श्रावण साबळे, संतोष हेगडे, नवनाथ भालेकर, अनिल कोरे, एन. पी. कोरे, आनंदराव ऐवळे, आकाश साळुंखे, सुर्यकांत खाडे, विशाल खाडे, संतोष कांबळे, आकाश जाधव, ओंकार भंडारी, कैफ, प्रियेश, सारंग मोहिते आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी नवीन प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येयधोरण तसेच कार्यपद्धती अवगत करून दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मा. नगरसेवक हरिदास पाटील, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे, सामाजिक न्याय विभागाचे युवक सांगली शहरारध्यक्ष गॅब्रियल तिवडे आदी उपस्थित होते.