Type Here to Get Search Results !

"यही है इंडिया"... ! सर्वधर्मीय, सर्वपक्षीय "दावत ए ईफ्तार"



सोलापूर : मार्कंडेय नगर कुमठा नाका येथे "दावते ए इफ्तार " कार्यक्रम आकिफराजा तांबोळी सर मित्र परिवारातर्फे गुरुवारी, २८ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमाचा उद्देश "सामाजिक एकता""सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, यही है इंडिया "चा सुंदर संदेश देण्याचा... ! प्रयत्न शिक्षकी तांबोळी कुटुंबाने केला. 

या कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे (कॉंग्रेस), महापौर सौ. श्रीकांचना यन्नम (भाजप) नगरसेवक शिवानंद पाटील (भाजप) यशवंत अण्णा पाथरूट (भाजप), वाहिद विजापुरे (कॉंग्रेस) उत्तमभैया नवगिरे, वसीम बुर्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस),बाळासाहेब माने (शिवसेना). रिजवान शेख (मुख्याध्यापक), गिरीश शिंदे सर, रविकांत कोळेकर, अझहर कोरबू (एमआयएम), तनवीर इनामदार (कॉंग्रेस), शब्बीर मुजावर, किरण चंदनशिवे, गौतम नवगिरे, नौशाद शेख, अब्दुल मुजावर, मेहबूब शेख, सागर कर्णेकर, मुसा अत्तार सर्व मित्र परिवार व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सौ. शाहीन अत्तार (मुख्याध्यापिका), सौ.मेहराज तांबोळी (मुख्याध्यापिका), आकिफराजा तांबोळी (मुख्याध्यापक), आरिफ राजा तांबोळी सर यांनी केले. या कार्यक्रमाचा उद्देश "सामाजिक एकता""सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, यही है इंडिया "चा सुंदर संदेश देण्याचा... ! प्रयत्न शिक्षकी कुटुंबाने केला. 

या कार्यक्रमास दावत ए इफ्तार त्यानंतर स्नेहभजनाचा आस्वाद परिसरातील बहुसंख्य मुस्लिम समाज बांधवांनी घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तांबोळी मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.