सोलापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, रोटरी ई क्लब ऑफ इलाईट व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांचेतर्फे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी सोमवारी, १८ मार्च रोजी स्तन कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात पोलीस उप आयुक्त डॉ. दिपाली काळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. ३० महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची या शिबिरात तपासणी करण्यात आली.