' रॉंग नंबर ' या २ शब्दात तपास अधिकाऱ्यांकडून मोठ्या कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ
सोलापूर : येथील अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत सर्वात मोठा छापा टाकलाय. उत्तर कसब्यातील या धाडीत हजारोंचा प्रतिबंधीत माल हस्तगत करण्यात आलाय. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत सिध्देश्वर तरटपट्टे याच्याविरूध्द गुन्हा दाखल असून ७०२०५१२६०८ असा भ्रमणध्वनी क्रमांक असलेल्या तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ' रॉंग नंबर ' म्हणून या मोठ्या कारवाईची माहिती देण्याचं मंगळवारी दुपारी टाळलंय.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी, १८ मार्च रोजी दुपारी टाकलेल्या छाप्यात उत्तर कसब्यातील के एस पान टपरी मधून २२ डब्बे बाबा सुगंधित तंबाखु, १.५ डब्बा रजनीगंधा पानमसाला, ४१ पाकीटे हिरवा गोवा, २४ पाकिटे व्हि १ सुगंधित तंबाखू, २४ पाकिटे विमल पानमसाला, ०२, पाकिटे हाय गुटखा, १ बॉक्स एम सुगंधित तंबाखू असा ४९,९६५ रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आलाय. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या रेणुका रमेश पाटील (अन्न व औषध प्रशासन म. राज्य, सोलापूर प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी प्रशांत सिध्देश्वर तरटपट्टे (वय ४२ वर्षे, रा. उंबरजकर वस्ती, निराळे वस्ती जवळ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुरनं १६३/२०२४ .भादवि १८८,२७२,२७३,३२८, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम २६(२) (i),२६(२) (ii), २६(२) (iv), २७ (३) (E),३० (२) (A),५९ प्रमाणे गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी गुन्हे शाखेचे सपोनि पाटील यांच्याकडं देण्यात आलाय.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील गुरनं गुरनं १६३/२०२४ संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ७०२०५१२६०८ भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्या क्रमांकावर जे बोलले, त्यांनी ' रॉंग नंबर ' म्हणून कॉल कट केला. मोबाईल नेटवर्कच्या कंजक्शन मुळे एखाद्या वेळी एखादा कॉल दुसरीकडे डायव्हर्ट होऊ शकतो, हा मोबाईल धारकांचा नित्याचाच अनुभव आहे, बहुतांशी अधिकारी सौजन्यशीलच असतात, रॉंग नंबर हा मोबाईल नेटवर्क कंजक्शन चा फटका होता की या मोठ्या कारवाईच्या तपासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता ग्रहीत धरून ' राँग नंबर ' म्हणणं हे देखील सौजन्याचा भाव दिसून येत आहे.