Type Here to Get Search Results !

लाकडी दांडक्याने मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

सोलापूर : तु आम्हाला शिवीगाळ करत आहेस, असे म्हणून राहुल बनसोडे व इतरांनी चुलत भावाला  लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना होटगी रोड, हत्तुरे वस्तीतील ओम नमो शिवाय नगरात शनिवारी, १७ मार्च रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात एका महिलेस चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ओम नमः शिवाय नगरातील रहिवासी बळीराम चंद्रकांत बनसोडे याच्या राहत्या घरी, त्याचा पत्नीसोबत घरगुती वाद चालला होता. त्यावेळी शेजारी राहणारा चुलत भाऊ राहुल बनसोडे व इतरांनी घराजवळ येऊन बळीरामच्या घराजवळ येऊन तू आम्हाला शिवीगाळी करीत आहेस, असे म्हणून शिवीगाळी सुरू केली.

हे वाक् युद्ध हातघाईवर आल्यावर, त्या चौघाजणांनी बळीरामला लाथा-बुक्क्याने मारहाण केली. या मारहाणीत राहुलने, डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने बळीराम (वय-३७ वर्षे) जखमी झाला. त्याच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी राहुल बनसोडे, केतन बनसोडे, संगिता बनसोडे आणि सुर्यकांत बनसोडे (सर्व रा- १२२/१२३, ओम नमः शिवाय नगर, हत्तुरे वस्ती, होटगी रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध भादवि ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार मणुरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.