सोलापूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु भारत निवडणूक आयोगाने, १६ मार्च २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे.
प्राप्त निवडणुक कार्यक्रमानुसार पुणे विभागातील सोलापूर जिल्हयांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. सदर निवडणुकांची आचारसंहिता १६ मार्च ते ०६ जून, २०२४ पर्यंत लागु आहे. त्यामुळे माहे एप्रिल, मे व जून या महिन्यातील पहिल्या सोमवारी आयोजित लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसल्याचे निवासी उप जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे.
ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे निर्देश आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत माहे एप्रिल, मे व जून या महिन्यात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे, निवासी उप जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविलं आहे.