सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय जागतिक महिला दिनानिमित्त खास माता पालकांसाठी भव्य हळदीकुंकू माता पालक पूजन व होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम पारितोषक पटकावून पल्लवी मुळे पैठणीच्या मानकरी ठरल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती रेखा राऊत (माजी जि. प. सदस्या) श्रीमती स्वाती कांबळे (माजी जि. प. सदस्या) ह्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या संचालिका माजी सभापती श्रीमती रजनी भडकुंबे होत्या. त्यांच्या संकल्पनेतून खास माता पालकांसाठी व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पल्लवी मुळे प्रथम पारितोषक (पैठणी) भाग्यश्री नागोडे द्वितीय पारितोषक( डिनर सेट) अर्चना भोजरंगे तृतीय पारितोषक( कप बशी सेट) तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आले.
हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त प्रत्येक महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयात माता पालक पूजन कार्यक्रम घेण्यात आला. माता पालक पूजनाचे महत्त्व उमेश जगताप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जरीना सय्यद सूत्रसंचालन सचिन नाईक नवरे आभार धर्मदेव शिंदे यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी होनसळ, राळेरास, हगलूर गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जरीना सय्यद, सुप्रिया पवार, यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.