Type Here to Get Search Results !

सोलापूरच्या इतिहासात डॉ. रेवा कुलकर्णी ठरल्या संस्कृत Ph.D साठी प्रथम गाईड


आता सोलापुरातही संस्कृत विषयात PhD

सोलापूर : जिल्ह्यात दयानंद महाविद्यालयात १९४० पासून  पदवीपर्यंत संस्कृत भाषेची सोय होती. २०१८-१९ पासून पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. आणि आता २०२४ पासून डॉ. रेवा हरि कुलकर्णी यांना पुअहो सोलापूर विद्यापीठाने संस्कृतसाठी गाईड शिप मान्य केल्याने संशोधन क्षेत्रही संस्कृतसाठी खुले झाले आहे. 

 डॉ. रेवा कुलकर्णी यांचा  IKS (भारतीय ज्ञान परंपरा ) न्याय,मीमांसा आदि विषयांचा अभ्यास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना  multy  disciplinary संशोधन करता येईल. प्राचार्य यांनी डॉ. रेवा कुलकर्णी यांचे या उपलब्धीबद्दल अभिनंदन केले.



डॉ. रेवा हरि कुलकर्णी या पुअहोसोविसो मध्ये संस्कृत अस्थायी अभ्यासमंडळाच्या समन्वयिका आहेत. तसेच त्या विद्याशाखा व विद्यापरिषदेच्या सदस्य आहेत.

या प्रसंगी प्रो. बी.एच्. दामजी, प्रो. वाय्.डी. पूजारी, प्रो. डी.आर्. गायकवाड, प्रो. आर्.व्ही. शिंदे, डॉ. रणवरे आदि उपस्थित होते. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो.  लक्ष्मीकांत दामा यांनीही अभिनंदन केले.