सांगलीत होणाऱ्या भाई नेरुरकर राज्य खो-खो स्पर्धेत सहभाग
सोलापूर : कुपवाड (सांगली) येथे ५ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भाई नेरुरकर राज्य खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा पुरुष संघाच्या कर्णधारपदी किरण स्पोर्ट्स क्लबच्या अक्षय इंगळे व किशोरी संघाच्या कर्णधारपदी अर्धनारी नटेश्वर वेळापूरच्या अनुष्का पवार यांची निवड करण्यात आली.
किशोरी संघाचे सराव शिबिर नेहरूनगर शासकीय मैदानावर समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने व ह. दे. प्रशालेच्या मैदानावर पुरुष संघाचे शिबिर उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने पार पडले. दोन्ही संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, पंचमंडळ सदस्य अजित शिंदे, संघांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक सुनील चव्हाण, उमाकांत गायकवाड, राजाराम शितोळे, सोनाली शिंदे-यादव, पुंडलिक कलखांबकर आदी उपस्थित होते.
अंतिम संघ - किशोरी : अनुष्का पवार (कर्णधार), वैष्णवी कुदळे, अन्वयी मंडले ( अर्धनारी नटेश्वर, वेळापूर), कल्याणी लामकाने, स्नेहा लामकाने, श्रावणी देठे( कल्याणराव काळे स्पोर्ट क्लब वाडीकुरोली, पंढरपूर), गौरी कोळवले, प्रणाली चव्हाण ( विकास विद्यालय अजनाळे), कीर्ती काटे( साकत प्रशाला बार्शी), इशा गोगावे (रुक्माई क्रीडा मंडळ), श्रद्धा हनमगोंडा, अक्षता प्रचंडे ( समृद्धी स्पोर्टस क्लब), सौम्या सोलापुरे( न्यू सोलापूर क्लब)आर्या चोरमोले, रिया चव्हाण( उत्कर्ष क्रीडा मंडळ). प्रशिक्षक : सुनील चव्हाण, संघ व्यवस्थापक : सोनाली शिंदे-यादव.
पुरुष : रामजी कश्यप, गणेश बोरकर, अजय कश्यप, कृष्णा बनसोडे, हबीब शेख, अजित रणदिवे ( अर्धनारी नटेश्वर, वेळापूर), अक्षय इंगळे, विकी कोळी (किरण स्पोर्ट्स ), सुजित मेटकरी, विनायक मूरडे ( शिवप्रतिष्ठान, मंगळवेढा ), जुबेर शेख , जाफर शेख, फराज शेख ( उत्कर्ष क्रीडा मंडळ), शुभम चव्हाण ( दिनबंधू, मंद्रूप), उदय लुंगसे ( लोकविकास, वेळापूर), प्रशिक्षक : उमाकांत गायकवाड, संघ व्यवस्थापक : राजाराम शितोळे.