सोलापूर : शिवसेना नेते व शिवसेनेचे संस्थापक सदस्य स्व. मनोहर जोशी हे शिवसैनिकांचे मार्गदर्शक आणि स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती होते. शिवसेनेच्या प्रत्येक घडामोडीत त्यांचा सहभाग होता. शिवसेनाप्रमुख व स्व.मनोहर जोशी यांच्या अथक प्रयत्नानेच शिवसेनेच्या वटवृक्ष झाला, अशी भावना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी व्यक्त केली.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना, त्यांनी नेहमी सामाजिक, राजकीय व प्रशासकीय कामकाजात कसे काम करायचे, हे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत होते, ते वृद्धापकाळत देखील अगदी अलीकडच्या काळापर्यंत, शिवसेना भवनात बसून मार्गदर्शन करत असत.
सन १९९५ साली युती सरकारच्या काळात ते मुख्यमंत्री होते. त्यावेळीही महाराष्ट्रातील विडी उद्योगावर संकट निर्माण झाले, तेव्हा विडि उद्योग साबूत राहण्यासाठी घेतलेल्या भूमिकेमुळेच, आजपर्यंत विडी उद्योग जिवंत आहे. त्यामुळे सोलापुरातील कामगारांचे प्रमुख उद्योग असलेल्या उद्योगात ६० ते ७० हजार कामगार तर महाराष्ट्रात एक कोटी कामगार, या उद्योगावर जगत आहेत.
अत्यंत मनमिळाऊ, स्मितभाषी व उच्चशिक्षित असलेले स्व. मनोहर जोशी यांच्या जाण्याने शिवसैनिक व शिवसेना पोरखी झाली आहे. अशा महान हिंदुत्ववादी कट्टर शिवसैनिकाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असंही कारमपुरी यांनी म्हटलंय.