Type Here to Get Search Results !

शहिद अशोक कामटे सोलापूरकरांच्या कायम हृदयात राहतील : निरंजन बोद्दूल

     

शहिद अशोक कामटे यांना अभिवादन      

सोलापूर : शहिद अशोक कामटे यांनी त्यांच्या सोलापुरातील सेवा कालात केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे दिशादर्शक कार्य शहिद अशोक कामटे विचार मंचमुळे नेहमी सोलापूरकरांच्या स्मरणात आहे. शहीद अशोक कामटे सोलापूरकरांच्या कायम हृदयात राहतील, अशा शब्दात निरंजन बोद्दूल यांनी म्हटले.

शहीद अशोक कामटे विचारमंच तर्फे आयपीएस अशोक कामटे यांच्या ६८ व्या जयंती निमित्त कामटे विचारमंच चे सल्लागार राजू हौशेट्टी यांच्या हस्ते शहिद अशोक कामटे याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निरंजन बोद्दूल बोलत होते. यावेळी शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर, शिवबा सामाजिक संस्था निरंजन बोध्दूल, ओम साई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर, विवेक फुटाणे यांनी शब्द सुमनांनी अभिवादन केले.

या प्रसंगी मनोज मलकुनाईक, गिरीष विजापूरे, सतीश माणेकर, मल्लू नलोगल, राजू पालकर, कुणाल चवरे, अप्पा पतंगे, विकास कुंदूर, प्रदिप पतंगे, शशीकांत जवळकर, संजय बेंबळगी, राजेश माने, ज्ञानेश्वर बिराजदार, अशोक तेलकर, राजू कलशेट्टी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कामटे जयंती करण्यात आली.

 फोटो ओळ : आयपीएस अशोक कामटे जयंतीनिमित्त अभिवादन करताना राजू हौशेट्टी, योगेश कुंदूर, रुपेश कर्पेकर, निरंजन बोद्दूल अवि फुटाणे, विकास कुंदूर छायाचित्रात दिसत आहेत.