सोलापूर : संत वीरशैव कक्कया समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील संभाजी शिंदे यांच्या मातोश्री व शरद शिवाजी शिंदे यांच्या काकू सौ. शांताबाई संभाजी शिंदे (रा.शेळगी, सोलापूर) यांचं शुक्रवारी अल्पशः आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता रविवार पेठ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.