सोलापूर : शिक्षण, आरक्षण, पेन्शन हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य, प्रोटान महाराष्ट्र राज्य व भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य या संघटनांच्या संयुक्त विध्यमाने शिक्षण, आरक्षण, नोकरी, पेन्शन हक्क यांच्या खाजगीकरणाच्या व सर्व प्रकारच्या शोषणकारी कंत्राटी भरतीच्या विरोधात रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी दु. ३ वा. MMRDA मैदान एशियन हार्ट हॉस्पिटल जवळ, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई येथे राज्यस्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या महामेळाव्याचे उद्घाटक शरदचंद्र पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार, नवी दिल्ली) यांचे हस्ते होणार आहे, तर अध्यक्षस्थानी वामन मेश्राम साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा, नवी दिल्ली) हे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून टी.व्ही. नलवडे (माजी न्यायमूर्ती, मुंबई हायकोर्ट), बाबा आढाव (अध्यक्ष, हमाल पंचायत), लक्ष्मण माने ( 'उपरा ' कार तथा माजी आमदार), जयंत पाटील (आमदार, तथा सरचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणुन विजय कोलते (अध्यक्ष, खाजगी शिक्षणसंस्था चालक महासंघ, महाराष्ट्र), कौस्तुभ गावडे (सी.ई.ओ. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), किशोर दराडे (आमदार, नाशिक शिक्षक मतदारसंघ), किरण सरनाईक (आमदार, अमरावती शिक्षक मतदारसंघ संघ), बाळाराम पाटील (माजी आमदार, कोकण शिक्षक मतदारसंघ), सुधाकर अडबाले (आमदार, नागपुर शिक्षक मतदारसंघ संघ), जयंत आसगावकर (आमदार, पुणे शिक्षक मतदारसंघ), सत्यजित तांबे (आमदार, नाशिक पदवीधर मतदारसंघ), नितेश कराळे (संचालक, फिनिक्स अॅकॅडमी, वर्धा) आणि विक्रम काळे (आमदार, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ) यांचीदेखील उपस्थिती असणार आहे.
सदर महामेळाव्याचे आयोजक हे महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्षांची कृती समिती, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघ (प्रोटान) व भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य), जयंत पाटील (आमदार, तथा सरचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या महामेळाव्याचे आयोजक हे महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्षांची कृती समिती, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघ (प्रोटान) व भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य हे आहेत.
महाराष्ट्रातील तमाम शिक्षक संघटना, शिक्षणसंस्था चालक संघटना, पालक, विद्यार्थी संघटना, सरकारी, निमसरकारी कर्मचारी, खाजगी क्लासेस, अकॅडमी मालक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर संघटना, लोकप्रतिनिधी व शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांनी या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.
......... चौकट .......
महामेळावा का आयोजित करण्यात आला आहे?
१) १८ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासन निर्णय ६५,६३९ सरकारी शाळांची दत्तक योजनेच्या माध्यमातून खाजगीकरण करण्याच्या कटाच्या विरोधात....
२) नवीन शैक्षणिक धोरणाच्या टप्याटप्याने होणाऱ्या अंमलबजावणी अंतर्गत २० पटापेक्षा कमी संख्या असणाऱ्या १४७८३ प्राथमिक शाळा बंद करण्याच्या विरोधात...
३) नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत भारतातील ४०००० महाविद्यालयांपैकी २५००० महाविद्यालयांना २०३० पर्यंत बंद केले जाणार आहेत त्याच्या विरोधात...
४) महाराष्ट्र शासन निर्णय क्र.संकीर्ण २०१७/प्र.क्र.९३/कामगार -८ अन्वये राज्य शासनाच्या १३८ संवर्गातील ४४००० पदांची भरती ९ खाजगी कंपन्यांमार्फत करुन सरकारी नोक-या नष्ट करण्याच्या विरोधात...
५ ) जुनी पेन्शन लागू करण्याच्या समर्थनार्थ...
६) शेतक-यांच्या मालाला हमीभाव, वीजबिल माफी, कर्जमाफीचे खोटे आश्वासन देण्याच्या विरोधात...
७) हिट अँड रन अशा काळ्या कायद्याच्या विरोधात...
८) नवीन शैक्षणिक धोरणामुळे अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात येणार आहेत. या विरोधात...
९) ईव्हीएमच्या विरोधात...
या ज्वलंत समस्यांच्या विरोधात हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.