सोलापूर/पंढरपूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या माघी यात्रेनिमित्त शहरातील सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने शहातील सर्व देशी, विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी आदेश जारी केले असून, मंगळवारी, २० फेब्रुवारी रोजी संपुर्ण दिवस पंढरपूर शहरातील देशी, विदेशी मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवावेत. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असंही आदेशात नमुद करण्यात आले आहे.