Type Here to Get Search Results !

अक्षय तृतियेचा मुहूर्त... ! पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन

 

सोलापूर : पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापूर शहरात गेल्या ४ दशकापासून सामुदायिक विवाह सोहळा पार पाडतो. यंदाही सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सिद्धेश्वर पेठ येथील मार्कंडेय मंदिर या ठिकाणी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष प्रथमेश महेश कोठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

यावेळी पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा यांच्या प्रमुख उपस्थिती होती. 

गेल्या ४० वर्षांपासून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सोलापूर शहरात सामुदायिक सोहळा आयोजित केला जातो. यंदा सामुदायिक सोहळ्यामध्ये सर्व समाज बांधव सामील होऊन विवाह सोहळ्यास नाव नोंदणी करावी, असे आवाहन  पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी केले.

याप्रसंगी पद्मशाली युवक संघटनेचे सचिव श्रीकांत दासरी. प्रेसिडेंट मनोहर माचर्ला, श्रीकांत कटकम, प्रकाश पोरंडला, अंबादास कुडक्याल, पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष नागार्जुन राऊल, गोविंद राजुल, पवन गुंडेटी, महेश येमूल आणि अन्य समाज बांधवांची उपस्थिती होती.