Type Here to Get Search Results !

पुळुजवाडीमध्ये तृप्ती खरे यांचा संवाद दौरा

पुळुज / दत्तात्रय पांढरे : मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या सौ. तृप्ती खरे यांच्या उपस्थितीत मकर संक्रातीचे औचित्य साधून मोहोळ मतदारसंघातील विविध गावात हळदी-कुंकू कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पॅटर्न मोहोळ मतदार संघात सुरू करण्यात आला आहे. या मतदार संघातील इच्छुक उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या जनसंपर्कात वाढ होत असल्याचे दिसत आहे. 

उद्योजक राजू खरे, २४७ मोहोळ विधानसभा राखीव विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार अशी जनसामान्यात ओळख निर्माण करण्यात आजमितीपर्यंत यशस्वी झाले आहे. मतदारसंघातील अनेक गावापर्यंत पोहोचून समाज उपयोगी कार्यक्रम राबवित तसेच सर्व समाजाच्या कार्यक्रमांना हजेरी लावून जनसंपर्कातील चेहरा अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. गेल्या वर्षभरात संपूर्ण मतदारसंघ ते पिंजून काढत आहेत. ते या दरम्यान गावभेटीच्या आणि मदत कार्याच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य जनतेच्या थेट संपर्कात आहेत.

अशातच मकर संक्रांतीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसापासून त्यांच्या सौ. तृप्ती खरे, हळदी-कुंकू कार्यक्रम सुरू केले आहेत, ज्यातून महिला वर्गांशी जनसंपर्काची पोकळी भरून निघत आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू विजय खरे यांनी आपले गाव भेटीसाठी दौरे वाढवले आहेत. यामुळे राजू खरे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. 

यामध्ये मोहोळ मतदारसंघातील असलेल्या पुळुजवाडी (ता. पंढरपूर) येथे महिलाशी संवाद साधत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तृप्ती खरे यांचा ग्रामपंचायततर्फे लोकनियुक्त सरपंच रेश्मा नानासो होनकळस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुळजवाडी येथे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी सौ. तृप्ती खरे यांनी सत्काराला उत्तर देताना, सर्व महिलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी पार्वती प्रभाकर मदने, सदस्या अर्चना महादेव मदने, मा. अध्यक्ष जिल्हा परिषद समिती जनाबाई हनुमंत मदने, रूपाली सलगर, पद्मिनी मदने, बचत गट प्रमुख माधुरी सुळ, बचत गट अध्यक्ष संगीता मदने, बचत गटातील अश्विनी यादव, बचत गट अध्यक्ष राणी यादव, बचत गट अध्यक्ष कल्पना सलगर यांच्यासह ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.