Type Here to Get Search Results !

हरीराम गोयल यांचे निधन

सोलापूर : येथील नवी पेठेतील व्यापारी हरीराम नवल गोयल यांचे शनिवारी, ०३ फेब्रुवारी रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. ते मृत्यूसमयी ६० वर्षांचे होते.

ते सुप्रसिद्ध तथा सर्वपरिचीत धनराज गोयल अँड सन्सचे मालक होते. नवी पेठ व्यापारी असोशिएशनचे माजी अध्यक्ष कै. नवल गोयल यांचे पुत्र होत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.