सोलापूर : विजापूर रस्त्यावरील सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राजवळ मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेले प्रकाश धानप्पा गोटे (वय ५९) यांचे उपचार चालू असताना खासगी रुग्णालयात मंगळवारी रात्री निधन झाले.
बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते कृषी खात्यात कृषी पर्यवेक्षक म्हणून नुकतेच निवृत्त झाले होते.
वीरशैव व्हिजनच्या सदस्या राजश्री गोटे यांचे पती आणि महापालिका आरोग्य विभागातील मुख्य निरीक्षक केदारनाथ गोटे यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.