सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी सेवालाल नगर येथे टाकलेल्या हातभट्टी तांड्यावरील धाडीत शंभर लिटर दारुसह अकरा हजार दोनशे लिटर रसायन जप्त करण्यात आले. तसेच सोलापूर- हैदराबाद रोडवरही बोलेरो वाहनातून वाहतूक होणारी चारशे लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली.
सोमवारी, २६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद रोडवर बोरामणी गावाच्या हद्दीत पाळत ठेऊन शिवराज शिवानंद पटणे ( वय - ३२ वर्षे रा. बोरामणी) यास पांढऱ्या रंगाच्या बोलेरो क्र. MH14 AV 1148 या चारचाकी वाहनातून चार रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारु वाहतूक करतांना पकडले. आरोपीच्या ताब्यातून २० हजारांहून अधिक किंमतीची ४०० लिटर हातभट्टी दारु व ०५ लाखाचे वाहन असा ०५ लाख २० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक जगन्नाथ पाटील, नंदकुमार जाधव, दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, धनाजी पोवार, सुखदेव सिद, समाधान शेळके, मानसी वाघ, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, नंदकुमार वेळापूरे, चेतन व्हनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती/वाहतूक/विक्री/साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास, या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केलं आहे.