सोलापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे वाहन परवाना बाबतचे सर्व कामकाज हे सारथी-४ या संगणकीय प्रणाली मार्फत केले जाते. दि.०१ फेब्रुवारीपासून सारथी-४ या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. या संगणकीय प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करून सर्व सेवा अद्यावत करण्याचे काम एनआयसी (नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटर) मार्फत करण्यात येत असून, लवकरच ऑनलाईन सुविधा पुन्हा सुरू होईल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविली आहे.
सारथी-४ या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे एनआयसी (नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटर) मार्फत कळविण्यात आले. यामुळे वाहन परवाना करिता वापरण्यात येणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेण्यास नागरिकांची गैरसोय होत असून, लवकरच पुन्हा ऑनलाईन सुविधा सुरू होईल याबाबत नागरिकांनी दखल घ्यावी, असे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.