सहभागी मुलींना टी-शर्ट, गेम पॅन्ट, ट्रॅक सूट, सॉक्स व शूज वाटप
सोलापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या खो-खो प्रशिक्षण शिबिराचा समारोप नेहरूनगर शासकीय मैदानावर झाला. या विनामूल्य प्रशिक्षण शिबिरास शहर व जिल्ह्यातील निवडक ५० खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आले.
शिबिरातील सहभागी खेळाडूंना दररोज सकाळी अल्पोपहार देण्यात येत होता. या शिबिरास तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव, क्रीडाशिक्षक पुंडलीक कलखांबकर, गणेश कुडले, गौरीशंकर कोनापुरे, जटेप्पा नाटीकर, माजी राष्ट्रीय खो-खो खेळाडू सुनील चव्हाण, राजाराम शितोळे व सोनाली शिंदे यांनी प्रशिक्षण दिले.
समारोपप्रसंगी सहभागी सर्व ५० मुलींना टी-शर्ट, गेम पॅन्ट, ट्रॅक सूट, सॉक्स व शूज जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते देण्यात आले.