Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने 'घराघरात शिवजयंती साजरी' अभियान


सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित, महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने घराघरात शिवजयंती साजरी, या अभियाना अंतर्गत विडी, यंत्रमाग व असंघटित कामगारांच्या मुलांना शिवाजी महाराजांच्या मूर्ती वाटप करण्यात आल्या.

कामगार सेनेच्या वतीने 'घराघरात शिवजयंती साजरी', या अभियानांतर्गत सुमारे शंभर कामगार कुटुंबीयांना, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले.

प्रारंभी कामगार सेना कार्यालयात शिवरायांचे पूजन करून, अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विडी, यंत्रमाग व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कुटुंबातील लहान मुलांना, शिवाजी महाराजांच्या मूर्ती , कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम व शूरकथा लहान मुलांना सांगितल्या, लहान मुला-मुलींनी शिवरायांचे गुण अंगीकारावे, असेही प्रबोधन केले. 



यावेळी बालगोपालांनी व कामगार बंधू भगिनींनी 'जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय', घोषणा या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले. कामगार कुटुंबीयातील सर्व बालकांनी शिवाजी महाराज मूर्ती मिरवणुकीने आपापल्या घरी मोठ्या उत्साहात व आनंदात घेऊन गेले.

विष्णू कारमपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मूर्ती वाटप कार्यक्रमास, रेखा अडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, जितेंद्र दारलू , शरणाप्पा जगले, बालाजी भंडारी , यांच्यासह कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फोटो ओळ :

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, घरोघरी शिवजयंती साजरी, या अभियानांतर्गत बालगोपालांना शिवाजी महाराजांची मूर्ती वाटप करताना, विष्णू कारमपुरी यांच्यासमवेत बाल शिवभक्त दिसत आहेत.