मराठा सेवा संघ यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज ३९४ व्या  जयंतीनिमित्त शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले,तसेच जिल्हा परिषद सोलापूर, मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालय, शिव-शाहू सेना संपर्क कार्यालय येथेही छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. 



यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, महानगर अध्यक्ष सुर्यकांत पाटील, उपाध्यक्ष सदाशिव पवार, सचिव लक्ष्मण महाडिक, गोवर्धन गुंड, राम माने, दत्ता जाधव, हनुमंत पवार, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, सचिन चव्हाण, परशुराम पवार, जिजाऊ ब्रिगेड च्या नंदा शिंदे, लता ढेरे, उज्वला साळुंखे, वर्षाराणी पवार, अंबादास सपकाळे इत्यादी उपस्थित होते.


To Top