स्वराज सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादीचा उपक्रम
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य मुर्तीस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलिस आयुक्त एस.राजकुमार यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष, जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केले होतं.
यानंतर सोलापूर जिल्हा लाठी-काठी संघटनेचे अश्विन कडलासकर, शिवराम भोसले, अंजना कडलासकर, किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे . शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा-तलवारबाजी, परशु कुऱ्हाड, लाठी- काठी या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. अवघ्या ०६ वर्षाच्या अर्णव पाठणकर या बाल शिवभक्ताने आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या प्रात्यक्षिका त जागतिक रेकार्डब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन गुरुवारी, १५ व शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी पोलिस कल्याण हाॅल ड्रीम पॅलेस, सेवासदन शाळे समोर येथे सर्व शिवप्रेमी सोलापूरकरांना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत मोफत पाहता येणार आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. ह्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा सोलापुरातील शिवप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.
या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,माजी गटनेते आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, अनिल उकरंडे, बिज्जू प्रधाने, अॅड..सलिम नदाफ, विजय जाधव, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, आकिब दफेदार, युवक प्रदेश सरचिटणीस खलिल शेख, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राजू बेळ्ळेनवरु, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अमिर शेख, संजय मोरे, महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, महिला शहर समन्वयक शशिकला कस्पटे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, कायम निमंत्रित सदस्या ज्येष्ठ नेत्या किरण मोहीते, संतोष पाटील, कविता संतोष पाटील, दक्षिण विधानसभा अध्यक्षा सुरेखा घाडगे, प्रिया पवार, कांचन पवार, शोभा सोनवणे, मध्य विधान सभा अध्यक्ष अबादीराजे अलमेहराज, विद्यार्थी अध्यक्ष पवनकुमार पाटील, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सुजित अवघडे, ईरफान शेख, विनायक रायकर, सोशल मीङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे संभाजी ब्रिगेङ कार्याध्यक्ष कृष्णात पवार ,शेखर कदम ,अमर आलुरे यांची उपस्थिती होती.