सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ-सरडेवाडी, खोताची वाडी येथील १०० हून अधिक वारकरी पायी दिंडीने पंढरपूर येथील पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. काबाडकष्ट करून जीवन जगणारे शेतकरी व शेतमजूर पुरुष व महिला वारकरी मोठ्या भक्तीभावाने रांत्रदिवस चालत निघालेल्या या विठ्ठल भक्तांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे माजी मुख्य प्रबंधक बसवराज चंद्रशेखर करपे व धर्मा चौगुले तसेच साळुंखे परिवारातर्फे उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे स्वागत करण्यात आले.
ही दिंडी यशस्वी करण्यासाठी भागवत हजारे, बाळू खंडाळकर, सावता हजारे, अनिल सरडे, बळी जाधव, बाणू सरडे, शिंदे, दिलीप पवार, दादा पवार, महादू देढे, सुनिता हजारे, सविता हजारे, सविता लांडगे, शशिकला हजारे, निर्मला हजारे, प्रभा म्हेत्रे हे परिश्रम घेत आहेत.
यावेळी भजन कार्यक्रम पार पडला. यामध्ये नारायण चौगुले, हर्षवर्धन करपे, आदित्य चौगुले, समर्थ चौगुले, योगिराज चौगुले, ध्रुवराज करपे आदी सहभागी झाले होते.