🔵 सोलापूर तालुका, पोलीस ठाणेची कामगिरी
🟣 सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध गावठी देशी दारूच्या हातभट्टया उद्धवस्त
🔵 ४१ हजार ३०० लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्ट
🟣 ४२०५ लिटर हातभट्टी दारू व ९३ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत
🔵 अवैध जुगार खेळणाऱ्या १२ इमसाविरूध्द गुन्हे दाखल
🟥 एकूण २३ लाख २८ हजार ५८५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुक -२०२४ ची प्रक्रिया शांततेत पार पाडुन निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील गुळवंची, सेवालालनगर, भानुदास तांडा व वडजी या परिसरात चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टया उध्दवस्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी (सोलापूर ग्रामीण उपविभाग) संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विशेष मोहीम राबवुन पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्टयावर छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे.
अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण १६ लाख ६४ हजार रूपये २०० रूपये किंमतीचे त्यामध्ये ४१ हजार ३०० लिटर गुळमिश्रीत रसायन, ४०६ प्लॅस्टीक बॅरेलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी देखील सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून कारवाई करून संबंधीत इसमाविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
मौजे कासेगांव, गुळवंची, पाकणी, कळमण, ति-हे, गावंडीदारफळ, मार्डी, तांदुळवाडी, सेवालालनगर, भानुदास तांडा व मुळेगाव या ठिकाणी चोरून अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या १५ इसमांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम ६५ ई अन्वये गुन्हे दाखल करून संबंधीत इसमाकडुन ४६८४ लिटर हातभट्टी दारू व ९३ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या असा २ लाख ५८ हजार ३१५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
मुळेगाव तांडा व तळेहिप्परगा येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या एकूण १२ इसमाविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये २ गुन्हे दाखल करून त्याचे कडुन ०५ दुचाकी मोटार सायकल वाहने, जुगाराचे साहित्य एकूण ४ लाख ०६ हजार ७० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाबाबत गोपनियरित्या माहिती प्राप्त करून त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात येणार आहे.
ही छापा कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर (सोलापूर उपविभाग, सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे (प्रभारी अधिकारी, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.