Type Here to Get Search Results !

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जयंतीदिनी छत्रपती शिवरायांना अभिवादन


सोलापूर : धर्मनिरपेक्ष रयतेचे राजे, कुळवाडी भूषण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने रा.स.क.म. संघटनेचे हंगामी जिल्हा अध्यक्ष विजय भांगे आणि जिल्हा सरचिटणीस राजा सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिल्पनिदेशक संघटनेचे सरचिटणीस एस.एल.शेळके, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बोलाबत्तीन, भीमराव लोखंडे, प्रविण वाघमारे, प्रभाकर माने, व्ही. एम. पटेल, निमंत्रक बाळकृष्ण पुतळे, सहसचिव, ए. आर. रंगरेज, कार्याध्यक्ष सी. एस. स्वामी, जिल्हा अध्यक्ष विजय भांगे, प्रमुख संघटक आशुतोष नाटकर, ज्येष्ठ सल्लागार नामदेव थोरात, जिल्हा सरचिटणीस राजा सोनकांबळे, कार्यालयीन सचिव सटवाजी होटकर, बी.जे.मोटे , पी.एम. केंदळे यांच्यासह रासकम संघटने मधील अनेक खातेनिहाय संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.