सोलापूर/संजय पवार :
ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, कालिकत या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सोलापूर येथील शुभम जगताप या आपल्या संघटनेच्या खेळाडूने ६५ किलो वजनी गटात देशपातळीवर चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्यध्यक्ष अनिल जाधव, सरचिटणीस विशाल गायकवाड, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, अविनाश गंजे, संजय हिरेमठ, शशिकांत अक्कलवाडी, संघटक आतिष जाधव, खजिनदार अनवरहुसेन शेख सर, सहसचिव आतिक नदाफ, संतोष कवडे सर, सुर्याजी यादव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.
शुभम जगताप यांच्या यशाप्रित्यर्थ अनेक सामाजिक, राजकीय तसेच विविध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.