विद्यापीठात शनिवारी योगविषयक कार्यशाळेचे आयोजन

shivrajya patra


सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आरोग्य विज्ञान संकुल अंतर्गत योगशिक्षक पदविका आणि एम.ए. योगा हे योगविषयक अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांना शहरातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून भविष्यात योगा विषयात असलेल्या नोकरीच्या संधी तसेच यूजीसी-नेट पात्रता परीक्षा यासंबंधी माहिती मिळावी, यासाठी आरोग्य विज्ञान संकुलामार्फत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर कार्यशाळा शनिवारी,१० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे  संकुलाच्या सभागृहात होणार आहे. सदर कार्यशाळेत योगा विषयातील यूजीसी-नेट पात्रता परीक्षा संबंधीत मार्गदर्शन सोबतच आयुष मंत्रालायामार्फत घेण्यात येणाऱ्या योग परीक्षा आणि त्यातील नोकरीच्या संधी याविषयांवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. 

तरी सदर कार्यशाळेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संकुलाचे समन्वयक डॉ. अभिजीत जगताप यांनी केले आहे. सदर कार्यशाळेचे नोंदणी शुल्क रु.५०/-आहे. नाव नोंदणीसाठी  प्रा.डॉ. शालिनी मस्के- ७७२२०३६८७६, प्रा. तृप्ती आवताडे- ७०२००६५३२१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

To Top