Type Here to Get Search Results !

अंकुर साहित्य संघातर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी आवाहन


सोलापूर/प्रतिनिधी: नवोदित साहित्यिकांचे विचारपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघ सोलापूरच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय उपाध्यक्षभरतकुमार मोरे व  जिल्हाअध्यक्ष नागनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

कवी नागनाथ गायकवाड साहित्य गौरव पुरस्कारासाठी सन १ जानेवारी  ते ३१ डिसेंबर २०२३ अखेर प्रकाशीत झालेल्या आत्मकथन व काव्यसंग्रह आमंत्रित आहे. तर दलितमित्र सौदागर मोरे समाजभुषण पुरस्कारासाठी राज्य, जिल्ह्यातील समाजसेवकांचे प्रस्ताव मागविले आहेत. रोख रक्कम, गौरवचिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ असा पुरस्काराचे स्वरूप असून एप्रिल २०२४ या महिन्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, या कार्यक्रमात कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कवीसंमेलनात सहभाग घेऊ इच्छिणारे इच्छुक कवीनी नागनाथ गायकवाड मोबाईल क्रमांक ९८५०२८०८३६, ९६९९०७९८७२ व  यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यांत येत आहे. सहभागी कवींना प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

पुरस्काराकरिता इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकलाकृतीच्या प्रत्येकी दोन प्रती ( आत्मकथन व काव्यसंग्रह) आणि अल्पपरिचय, पासपोर्ट फोटो आणि समाजभुषण पुरस्कारासाठी केलेल्या कार्याचा प्रस्ताव फोटो, अल्पपरिचय, फोटो, व दैनिक वृत्तपत्र कात्रणाच्या प्रतीसह २८ फेबुवारी २०२४ अखेर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने भरतकुमार मोरे, 'अनुष्का'  प्लॉट नं. १९, डुमणेनगर, बार्शी रोड, बाळे, सोलापूर-४१३२५५ या पत्यावर पाठवावेत, असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष  नागनाथ गायकवाड, व भरतकुमार मोरे यांनी केलं आहे.