Type Here to Get Search Results !

मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्षपदी डॉ. जी. के. देशमुख तर शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील


सोलापूर : मराठा सेवा संघाची  जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मयूर मंगल कार्यालयात थाटात पार पडला जिल्हाध्यक्ष म्हणून  डॉ. जी. के. देशमुख यांची तर शहराध्यक्ष म्हणून सूर्यकांत पाटील यांनी पदभार स्वीकारला. तसेच नव्याने गठीत करण्यात आलेल्या जिल्हा आणि शहर पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांची पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदावर  डॉ. जे. के. देशमुख यांची निवड झाली. देशमुख यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. यानंतर सूर्यकांत पाटील यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली. या दोन्ही जिल्हा आणि शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडला.

यावेळी विचारपीठावर  विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, सेवा संघाचे समन्वय दत्तामामा मुळे, शहराध्यक्ष सुर्यकांत पाटील,  जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सचिव उज्वला साळुंखे,  उपाध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत,  शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष निर्मलाताई शेळवणे, लक्ष्मण महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोवर्धन गुंड यांनी जिजाऊ वंदना घेतली तर शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहर जिल्हा आणि शहर कार्यकारिणी तसेच तालुकाध्यक्ष विविध कक्षाच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीची पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.




यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे म्हणाले, सोलापूर जिल्हा सोलापूर मराठा सेवा संघ हा नेहमीच चांगल्या कामात अग्रेसर राहिलेला आहे. १९९० पासून मराठा सेवा संघाचा जिल्ह्यातील कार्याचा आलेख चढता राहिला आहे. नूतन जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी हीच परंपरा कायम ठेवत सोलापूर शाखेची कार्यक्षेत्र वाढवत परंपरा कायम ठेवण्याची अपेक्षा यांनी व्यक्त केली.

 नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. जे. के. देशमुख यांनी  जिल्हा आणि शहर पदाधिकारी आणि विविध कक्षाच्या पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन सेवा संघाचे काम केलेे जाईल, संघाचा मोठा विस्तार केला जाईल, तसेच मुलींसाठी वस्तीगृह निर्माण करणे, या गोष्टीला प्राधान्य दिले जाईल, असं व्यक्त केलेल्या  मनोगतात म्हटले.

 ...... चौकट ....

 शहर पदाधिकाऱ्यात...

शहर उपाध्यक्ष प्रवीण थोरात, कार्याध्यक्ष सुजय वाघचवरे,  यशवंत साळुंखे, सचिव संतोष माने,  सहसचिव अतुल धुमाळ,  संघटक विकास भांगे, राहुल ढवळे, निमंत्रित सदस्य प्रकाश शेंडगे, जुळे सोलापूर विभागीय अध्यक्ष राहुल मांजरे, पूर्व विभाग अध्यक्ष सुनील जाधव, उत्तर सोलापूर विभागीय अध्यक्ष रमेश जाधव, सदस्य नानासाहेब साठे, प्रसाद खोबरे. 

......चौकट......

जिल्हा पदाधिकाऱ्यांत...

डॉ. जी के देशमुख जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष बब्रुवान माने,  सदाशिव पवार, कार्याध्यक्ष विष्णू थिटे, जिल्हा समन्वयक दत्ता मुळे,  सचिव लक्ष्मण महाडिक, सहसचिव दिनकर देशमुख, किरण गाढवे, कोषाध्यक्ष गिरीश भोसले, संघटक आर. पी. पाटील, महेश पाटील, सदस्य डॉ. प्रमोद पाटील, महादेव गवळी, संतोष चव्हाण, एस. एल. लोकरे, प्रवीण घाडगे, डॉ. शंकर नवले, डॉ.विजयकुमार उबाळे, चंद्रकांत चव्हाण, आरोग्य कक्षाचे जिल्हाध्यक्ष, न्याय कक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव,  अर्थ कक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष कदम, विज्ञान व तंत्रज्ञान कक्षाचे अध्यक्ष अश्विनी भोपळे.

 ....चौकट......

अन्य कक्ष...

तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, शिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत चव्हाण, पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जीवन यादव, वधू-वर सूचक कक्षाचे जिल्हाध्यक्ष अंबादास सपकाळे, जिल्हा उद्योग कक्षाचे गिरीश जगदाळे, जिल्हा तुकाराम  साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष वर्षा मुसळे, ज्येष्ठ नागरिक कक्षाचे नवनाथ कदम, वीर भगतसिंग विद्यार्थी कक्षाचे परशुराम पवार.