Type Here to Get Search Results !

शास्त्री नगर भागात स्वच्छ आणि उच्च दाबाने पाणी पुरवठा व्हावा : वाहिद विजापुरे


सोलापूर : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर भागातील हनफिया मस्जिद, दत्त मंदिर, सोमपा दवाखाना, डॉ. अन्सारी चौक, व्हालीबॉल ग्राऊंड या परिसरात पिण्याच्या पाण्यामध्ये गढूळ आणि दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना अनेक रोगराईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या परिसरातील नागरिकांना स्वच्छ व उच्च दाबाने पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी केलीय.

शास्त्रीनगर भागात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार वाहिद बिजापुरे यांनी संबधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून फोनद्रे वारंवार कळविली, मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना झाली नाही. या भागात पिण्याचे पाणी हे अत्यंत कमी दाबाने येत असून रहिवाशांना पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, ही बाब वाहिद बिजापुरे यांनी निवेदनाद्वारे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

शास्त्रीनगर भागात गढूळ पाणीपुरवठा व कमी दाबाने पाणी होत असल्याने त्यामागे काही षड्:यंत्र आहे किंवा कसे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी आणि या भागाला शहरातील अन्य भागाप्रमाणे स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी दिला.