सोलापूर : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या ' जगात भारी, १९ फेब्रुवारी ' शिवजयंतीच्या तयारीला आता वेग आला आहे. शिवजन्मोत्सवादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने गुरुवारी, ०८ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त निखिल मोरे यांची सोलापूर महापालिकेत भेट घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज चौक 'नो डिजिटल झोन' करावा, अशा आशयाचं निवेदन दिलं.
दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक परिसराला डिजिटलने विळखा घातल्याचे दृश्य प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पावला-पावलावर विविध संघटनांचे बॅनर लागलेले आहेत. हा परिसर नो डिजिटल झोन करण्यात यावा, त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, लावण्यात आलेले बॅनर हटवण्यात यावेत, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक ' डिजिटल ' च्या विळख्यातून मुक्त करावा, अशी मागणी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे करण्यात आलीय.
त्याचसोबत रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी पाळण्याचा कार्यक्रम आयोजित्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकङून योग्य ती खबरदारी घेऊन शासनामार्फत विविध सेवा-सुविधा वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात याव्यात. रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती ट्रस्ट अध्यक्ष नानासाहेब, काळे, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, ट्रस्टी सदस्य राजन जाधव, ट्रस्टी सचिव प्रीतम परदेशी, ट्रस्टी सदस्य भाऊसाहेब रोडगे, माऊली पवार, ट्रस्टी सदस्य प्रकाश ननवरे, महेश धाराशिवकर, तात्या वाघमोडे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, उत्सव कार्याध्यक्ष रवी मोहिते, सचिन स्वामी, देविदास घुले, मोहन खमीतकर, उज्वल दीक्षित, प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे, अर्जुन शिवसिंगवाले, गणेश तिकटे यांची उपस्थिती होती.