सोलापूर/संजय पवार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांनी शिवसेना दक्षिण तालुका उपप्रमुखपदी सखाराम वाघ यांची नुकतीच निवड करण्यात आली.
शिवसेना सोलापूर लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिव सेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सोलापूर उजिल्हाप्रमुख धर्मराज बगले, शिव सेना दक्षिण तालुकाप्रमुख योगीराज पाटील, वरळेगांवचे माजी सरपंच श्रीमंत हक्के, भाऊ ग्रुपचे छत्रगुण भाऊ माने, क्रांती संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी, उळेचे शिवसैनिक शिंदे आणि मित्रपरिवार, शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवलीय, हा सामान्य शिवसैनिकाचा मोठा सन्मान आहे. या पदाचा उपयोग गोरगरीब लोकांना व्हायला हवा व सर्व सामान्य लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सखाराम वाघ यांनी निवडीनंतर बोलताना म्हटले. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.