(छायाचित्रं सौजन्य : प्रशांत गायकवाड)
सोलापूर : सोलापूरकरांच्या नशिबी पाणी टंचाई जणू पाचवीला पूजलीय असं म्हटलं जातं. या नागरिकांना दैनंदिन, एक दिवसाआड ते पाच दिवसाआड पिण्याचं पाणी भरण्याची सवय झालीय. अशात शहराला उजनी सोलापूर जल वाहिनी ही जीवनदायिनी बनलीय. ही जलवाहिनी मोहोळ तालुक्यातील यावली पाटीजवळ फुटली असून भीषण पाणीटंचाईत लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
सोलापूर शहराचा पाणीपुरवठा याचं जलवाहिनीवर अवलंबून आहे. उजनी धरणातील पाणी पातळी दिवसाआड झपाट्याने उतरत असून दुष्काळात तेरावा महिना असं लाखो लिटर पाणी वाया जात असलेल्या पाण्याकडं पाहिल्यावर वाटतंय.