सोलापूर : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी रंगभवन चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे महाआरती व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर जिल्हयाच्या महिला पक्ष निरीक्षक दिपाली पांढरे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ मुर्तीस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसर दणाणून सोङला होता.
यावेळी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छञपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे पूजन जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम ,शहर समन्वयक शशिकला कस्पटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर उत्साहात पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी या उक्रमाबाबत बोलताना, सोलापूर जिल्हयाच्या महिला पक्ष निरीक्षक दिपाली पांढरे व महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी अधिक माहिती दिली.
याप्रसंगी सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, युवक प्रदेश सरचिटणीस खलिल शेख, विद्यार्थी अध्यक्ष पवनकुमार पाटील, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राजू बेळ्ळेनवरु, कार्याध्यक्ष प्रिया पवार, कांचन पवार, अनुराधा बनसोडे, सायरा शेख, किरण मोहिते, लता ढेरे, सोशल मिडीया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, श्याम गांगर्डे, बसवराज सारवाडकर, किरण अवताडे, आशिष म्हैत्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी व महिला-भगिनी तसेच असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.