राष्ट्रवादीच्या कौटुंबिक स्वागतप्रसंगी चौधरी यांच्या ' आनंद ' मय शुभेच्छा
सोलापूर : चंदनशिवे, महानगरपालिकेतील आपला दांडगा अनुभव पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, तुम्ही राष्ट्रवादीचे पहिले महापौर होणार, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी पहिल्यांदा सोलापूर शहर राष्ट्रवादी भवनात आले असता, त्यांचा जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शहर कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा फेटा,शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आनंद चंदनशिवे पक्षात आल्याने निश्चितच पक्षाची ताकद वाढणार असून भविष्यात अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात आपण मिळून काम करूयात, तसेच आपल्या पुढील राजकीय कारकीर्दीस मन:पूर्वक शुभेच्छा जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिल्या.
पक्ष कार्यालयातील कौटुंबिक स्वागतप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते प्रा. श्रीनिवास कोंडी, महिला अध्यक्ष सौ. संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, श्रीमती लता ढेरे, बसवराज कोळी, सोमनाथ शिंदे, अलमराज आबादी राजे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.