सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी तन-मन-धनाने कार्य करू, असा निर्धार पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे भूषवत असून रि.पा.इं.राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यासंदर्भात विचार विनिमयासाठी बुधवार पेठ येथील मध्यवर्ती मिलिंद बुद्ध विहार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षपदी शहर समन्वयक शाम धुरी होते.
सदर बैठकीत मेळावा संपूर्ण महाराष्ट्रासमोर आदर्श मेळावा म्हणून उभा राहील, असा निश्चय करण्यात आला, यामध्ये मेळाव्यासंदर्भात असणारे प्रेस मीडिया जाहिरात, इलेक्ट्रॉनिक मीडिया जाहिरात, डिजिटल जाहिराती, पॉम्पलेट, सोशल मीडिया, रिक्षाद्वारे प्रचार व प्रसार तसेच कॉर्नर बैठका अशा आदी गोष्टीची चर्चा करण्यात आली.
या बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे के.डी कांबळे, सुशील सरवदे, राजेश उबाळे, ॲड. जयप्रकाश भंडारे, विकास सरवदे, दावला सुर्वे, बापू सदाफुले, उपगुप्त चौधरी, सुग्रीव जेटीथोर, शिवम सोनकांबळे, अमोल वामणे, सचिन शिंदे, सचिन कांबळे, श्रीनिवास सरवदे, राहुल गाडे, किशोर इंगळे, विशाल कांबळे, उमेश उबाळे, बापू शिवशरण, हरिष जाधव, मलिक राजगुरू, रजनीकांत बाळशंकर, राहुल वाळके, शितल कांबळे, सचिन गायकवाड, विकी चव्हाण, संघपाल घोडकुंबे, दत्ता कांबळे, नागेश भंडारे, सचिन बनसोडे, सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी, सदस्य प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.