Type Here to Get Search Results !

फिलिपिन्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी इंडियन मॉडेल स्कूलच्या श्रावणी सूर्यवंशीची निवड



सोलापूर : फिलिपिन्स येथे २३ फेब्रुवारी ते ०१ मार्च दरम्यान होणाऱ्या अकराव्या डायव्हिंग एशियन एज ग्रुप इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२४ साठी भारताकडून सोलापूर ची डायविंगपटू श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिची निवड झालीय. श्रावणी ही इंडियन मॉडेल्स स्कूल ची विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून ०७ डायविंगपटूची निवड झाली असून श्रावणी सूर्यवंशी ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धक असून सोलापूरकरांसाठी गौरवाची बाब आहे.

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या BIMSTEC एक्वाटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत डायविंग या क्रीड़ा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करताना श्रावणीने हायबोर्ड मध्ये २३४ गुणासह सिल्वर मेडल, ३ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये २४२.३५ गुणासह गोल्ड मेडल, तर १ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये २०९.७५ गुणासह ब्रांज मेडल पटकावले. यामुळे भारताला १ली BIMSTEC डाइविंग-वुमेन टीम चैम्पियनशिप प्राप्त झाली आहे. 

श्रावणीने आजवर डायव्हिंग प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत श्रावणीने आजवर डायव्हिंग राज्य पातळीवर १६ गोल्ड आणि २ आणि एक ब्रांज  पदक मिळवले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने ७ गोल्ड, ४ सिल्वर आणि २ ब्रांझ पदके मिळविली आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने ०१ गोल्ड, ०१ सिल्वर आणि ०१ ब्रांझ पदक मिळवले आहे.




सोलापुरातील प्रसिद्ध बॉण्डरायटर प्रताप सूर्यवंशी यांची ती कन्या आहे. डायविंगसाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

फिलिपाईन्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याबद्दल डायव्हिंग फिना फिना जज मयूर व्यास, एस एफ आय चे जनरल सेक्रेटरी मोनल चोक्सी, कमलेश नानावटी, रेल्वे कोच भाऊसाहेब दिघे, ए एस आय कोच कुंज किशोर मेलम यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

सोलापूर हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख, सचिव पार्वतय्या श्रीराम, सोलापूरच्या इंडियन मॉडेल्स स्कूलचे अमोल जोशी, सायली जोशी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी,  शिवसेना ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख दत्तात्रय वानकर, उद्योजक प्रल्हाद काशीद आदींनी कौतुक करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.